सोलापूर शहर व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
लातूरचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांनी घेतल्या मुलाखती

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑक्टोंबर २०१४- राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ७० जणांनी मागणी केली होती इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यावर जबाबदारी दिली होती.

काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे,जिल्हा कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार यांनी केले.यानंतर डॉ शिवाजीराव काळगे यांनी इच्छुकांच्या मुलाखती व्यक्तिगतरित्या घेतल्या. प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा अहवाल, सामाजिक आणि राजकीय कार्याची माहिती यावेळी दिली.एकूण ६९ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवार
२४८ – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, सुदीप चाकोते, सुनील रसाळे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, सातलिंग शटगार या ०७ जणांनी उमेदवारी मागितली आहे.
२४९- सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातून चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारे, अंबादास बाबा करगुळे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी,शौकत पठाण,रुस्तम कंपली, हसीब नदाफ, मैनुद्दीन शेख, प्रा.असिफ इकबाल,शौकत पठाण,महिबुब (M.D.) शेख,रियाज सय्यद,सुधाकर बनसोडे,अँड राहुल ओव्हाळे या १८ जणांनी उमेदवारी मागितली आहे.
२५१- दक्षिण विधानसभा मतदारसंघातून- दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, महादेव कोगनुरे, अशोक देवकते, सुभाष चव्हाण, हरीश पाटील, सुदीप चाकोते, फिरदोस पटेल,जाफरताज पटेल,रमेश हसापूरे,शालिवाहन माने देशमुख,भोजराज पवार,विजयकुमार हतुरे, प्रशांत कांबळे, रफिक काझी,चिदानंद सुंटे,रजाक मुजावर, इंदुमती अलगोंडा पाटील, अलका ताई राठोड, रुकय्याबानू बिराजदार या २२ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२५० अक्कलकोट विधानसभा मतदार संघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार- सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे, मल्लिकार्जुन महादेव पाटील,भीमाशंकर नागप्पा जमादार, सौ.पूजा राहुल पाटील चिक्केहळ्ळी
२४७ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार-
अँड.गजेंद्र गौतम खरात,किशोर नेताजी पवार,प्रशांत पुंडलिक साळे,किशोरकुमार रघुनाथ सरदेसाई,सुशीलाताई आबुटे,अमोल बंगाळे,
२४५ माढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार-
सौ मीनलताई गणपतराव साठे, प्रा. संदीप वसंतराव साठे , मालोजी देशमुख
२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार- आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर,भगीरथ भालके, अमोल राजेंद्र म्हमाणे,अशोक चेळेकर,अँड. रविकिरण सुरेश कोळेकर,

२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार
विजय बाळकृष्ण साळुंके (प्रदेश)
२५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार प्रशांत पुंडलिक साळे
२४४ – करमाळा विधानसभा मतदारसंघातून प्रतापराव नामदेवराव जगताप
असे इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारीची मागणी केली आहे.

