नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाने आपली अभंग गायन सेवा रुजू केली. मंडळाच्या गायन सेवेने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

वीणा भजनी मंडळ दरवर्षी नवरात्रामध्ये आपली भजन व कीर्तन सेवा रुजू करतात.देवीची गाणी, विविध संतांचे अभंग, गौळण आदी गायनाने श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपातील श्रोते तल्लीन झाले होते.

वीणा भजनी मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भजन गायनाबद्दल मंदिर समितीच्या वतीने सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top