जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड करुन सोन्याचे दागिने जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश
पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.२६/०८/२०२५ रोजी रात्रौ ०८.३५ वाजण्याचे सुमारास मौजे डहाणू आगर कॉटेज हॉस्पीटल जवळील कॅन्टींग येथील चहा-वडा पाव विक्रीचे कॅन्टींगमध्ये फिर्यादी श्रीमती धनु अशोक पाटील वय ६५ वर्ष हजर असतांना त्यांचेकडे मोटारसायकल वरुन आलेल्या एका अनोळखी इसमाने पाण्याची बॉटल मागितली. फिर्यादी त्यास पाण्याची बॉटल देत असतांना मोटार सायकलवरील अनोळखी इसमाने फिर्यादी यांचेकडुन पाण्याची बॉटल व त्यांचे गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ बळजबरीने हिसकावुन घेवुन मोटारसायकल वरुन पळुन गेला.या बाबत डहाणू पोलीस ठाणे गु.र.नं.१३७/ २०२५ भारतीय न्याय संहिता अधि. कलम ३०४ (२) प्रमाणे दि.२७/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
तसेच दि.२४/०३/२०२५ रोजी रात्रौ ०९.५५ चे सुमारास रोहीदास काशिनाथ देव वय ५५ वर्षे रा. मुरबा ता.जि.पालघर हे मौजे बोईसर टाटा स्टील कंपनीचे गेट क्रमांक ०४ समोर त्यांची स्कुटी पार्कीग करीत असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने खेचुन चोरी करुन नेल्याबाबत बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र. नं. १४८/२०२५ भारतीय न्याय संहिता अधि. कलम ३०४ (२),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वरील दोन्ही गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पालघर व डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पालघर चे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने अथक परिश्रम घेवुन यातील आरोपीची बातमीदारांचे मार्फत माहिती मिळवुन तसेच तांत्रीक मदतीने शोध घेवुन आरोपी दिपेश सुरेश पटेल वय २२ वर्षे, रा. बोईसर दांडीपाडा शिवमंदिराचे बाजुला, सद्या रा.सरावली ता.जि.पालघर यास निष्पन्न करून दि.२२/०९/२०२५ रोजी त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारासह सदरचे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे सदर आरोपीस अटक करून गुन्ह्यात जबरीने चोरलेले सोन्याचे दागीने १) १,९५,५००/- रु. सोन्याची बोरमाळ, २) १,७२,५००/- रु. सोन्याची चैन आणि गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल ३) ९०,०००/- रु. पल्सर क्र. एमएच-४८/डीएन-२८०८ असा एकुण ४,५८,०००/- रु. किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि/दिनेश आघाव नेमणुक डहाणू पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर ,अपर पोलीस अधीक्षक, विनायक नरळे पालघर, उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक बोईसर विभाग,उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे डहाणु विभाग, यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील,पोलीस निरीक्षक किरण पवार,पोउपनि/रविंद्र वानखेडे, पोउपनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोअमं/महेश अवतार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व डहाणू पोलीस ठाणे यांनी यशस्वी रित्या पार पाडलेली आहे.