मुंबई : मुंबईत दसऱ्याच्या निमित्ताने काल चांगलीच लगबग पाहायला मिळाली. पण ऐन उत्सवाच्या दिवशी भिवंडीमध्ये कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. काल दिनांक १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता मे. महालक्ष्मी फर्निचर गोदामाच्या बाजूला, कशेळी टोल नाका जवळ, कशेळी, भिवंडी, ठाणे याठिकाणी चामुंडा कॉम्प्लेक्स मधील फर्निचर गोदामाला आग लागली होती. या आगीत अंदाजे ३० ते ४० गाळे जळाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.
सद्यस्थितीत घटनास्थळी पोलीस अधिकारी, ठा.म.पा.चे प्रा.आ.व्य.कक्षाचे कर्मचारी, बाळकुम अग्नि. केंद्राचा १ जम्बो वॉटर टँकर, भिवंडी अग्नि. केंद्राचे १ फायर वाहन तसेच ४ खासगी वॉटर टँकर, एक रुग्णवाहिका (१०८) उपस्थित होते. सदरची आग आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४:४७ वाजता तब्बल ५ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पुर्णपणे विझविण्यात आली असून आगीत कोणीही जखमी नाही.
आम्हाला आता उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी दिसू लागलेत; राणेंचा खोचक टोला
अधिक माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोडाऊनला लागून असलेल्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या मते, आग लागल्यानंतर लगेचच फर्निचर गोदाम पूर्णपणे ज्वालांनी भस्मसात झाले. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. स्थानिक लोकांनी घाईघाईने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
आगीच्या व्हिडिओमध्ये आवाज स्पष्ट ऐकू येतो. यामध्ये, संपूर्ण गोदाम आगीच्या लोळात सापडलेले पाहायला मिळत आहे. फर्निचरने भरलेल्या या गोदामात आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
धक्कादायक! कोकणात सापडले तब्बल १६२ जिवंत गावठी बॉम्ब; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
Source link
Like this:
Like Loading...