पुण्यात मोबाईल चोरी करणाऱ्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक

[ad_1]

arrest
महाराष्ट्रातील पुणे शहरातील पोलिसांनी एका संगीत महोत्सवादरम्यान अनेक मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 14 गॅझेट जप्त करण्यात आले आहे. एका अधिकारींनी माहिती दिली आहे की, 18 ऑक्टोबर रोजी खराडी परिसरात आयोजित संगीत महोत्सवादरम्यान 4.87 लाख रुपये किमतीचे 36 मोबाईल फोन चोरीला गेले होते.

 

तसेच'18ऑक्टोबर रोजी खराडी परिसरातील एका मैदानावर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. तसेच चोरीच्या घटनांमागे टोळीचा हात असल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपींकडून 14 मोबाईल जप्त केले. तसेच अधिकारींनी सांगितले की, 'पोलिसांच्या पथकाने चार जणांना अटक केली आहे, त्यापैकी दोन हैदराबादचे आणि दोन मुंबईतील आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत असे देखील अधिकारींनी सांगितले.  

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top