पंढरपूर हिंदुमहासभा व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण

पंढरपूर हिंदुमहासभेच्या वतीने व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या थोर सुपुत्राच्या, गोवा मुक्तिसंग्रामामध्ये विलक्षण क्रांतिकार्य केलेल्या,पुरुषार्थ गाजवलेल्या क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हिंदुत्व शौर्य पुरस्कार यावेळी दि.१९ नोव्हेंबर शनिवारी प्रदान करण्यात आला. सोलापूरमध्ये लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या माता-भगिनींची सुटका करणाऱ्या संजय साळुंखे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

रुक्मिणी पटांगण येथे सायंकाळी ७.३० वाजता स्वातंत्र्यवीरांच्या अखिल हिंदु विजय ध्वज गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विवेक बेणारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.महेश खिस्ते यांनी पुरस्काराचा, पुरस्कारार्थी व अन्य मान्यवरांचा परिचय करून दिला.

प्रास्ताविकात अभयसिंह इचगांवकर यांनी श्री वसंत बाबाजींच्या पराक्रमाचा इतिहास मांडला व पुरस्काराचे प्रयोजन मांडत आजपर्यंतच्या पुरस्कारार्थींचा निर्देश केला. त्यानंतर मुख्य पुरस्काराच्या प्रदानाचा कार्यक्रम पार पाडला ज्यात शाल, श्रीफल,अखिल हिंदुसभेचा कुंडलिनी कृपाणांकित प्रणवांकित अभ्युदय-नि:श्रेयस प्रदर्शक ध्वज व ११,००० रुपये रोख धनराशी (रक्कम) व मानपत्र असं स्वरुप होते.

त्यानंतर विश्व हिंदु परिषदेचे लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी हिंदु समाजासमोरच्या लव्ह जिहाद वगैरे सर्व समस्यांचा निर्देश केला व संघटनाचे आवाहन केले. पुरस्काराला उत्तर देताना संजय साळुखेंनी लव्ह जिहादला मुली कशा बळी पडतात, त्यांना सोडवताना काय अडचणी येतात हे सांगितले व त्यावरचे उपायही सांगितले.

सोलापुर हिंदुसभा अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी हिंदुत्वाचं आणि गोरक्षण करत असताना येणाऱ्या समस्या मांडल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी हभप श्रीचक्रीनाथ महाराज सिद्धरसांनी विविध पुराणांतरीच्या कथा सांगत स्वधर्मपालनाचा संदेश देत येणाऱ्या संकटांना कसे तोंड देता येईल यावर भाष्य केलं.

पंढरपूर हिंदुमहासभेचे अध्यक्ष विकास मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.तुकाराम चिंचणीकर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुसभेचे ओंकार वाटाणे, विठ्ठल बडवे,प्रशांत खंडागळे आदींसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Back To Top