नवाब मलिक, वानखेडेंचे प्रश्न मला विचारू नका, मला तेवढाच उद्योग नाही; अजित पवार भडकले


हायलाइट्स:

  • अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद
  • नवाब मलिक यांच्याबद्दल प्रश्न विचारताच भडकले
  • ‘नो कमेंट्स’ करण्याचा मला अधिकार – अजित पवार

पुणे: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व समीर वानखेडे (Nawab Malik Vs Sameer Wankhede) यांच्यात सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट नकार दिला आहे. ‘इतरांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मी बांधील नाही. मला तेवढाच उद्योग नाही. इतरही भरपूर कामं आहेत,’ अशा शब्दांत अजित पवारांनी पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना सुनावलं.

वाचा: कोविड लसीचे १०० कोटी डोस खरंच दिले गेलेत का?; संजय राऊतांना शंका

पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार दर शुक्रवारी जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतात व त्या संबंधी पत्रकार परिषदेत माहिती देतात. आजही त्यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे त्यांना साखर कारखान्यातील घोटाळ्यांच्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. त्यानंतर त्यांना नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. ‘मलिक आणि वानखेडेंचे प्रश्न मला विचारू नका. ते त्यांना विचारा. त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी इथं आलेलो नाही. पुण्याचा पालकमंत्री म्हणून जे काही प्रश्न आहेत त्यावर मी बोलतोय,’ असं पवार म्हणाले.

वाचा: अमोल कोल्हेंनी अमित शहांना दिल्या खास शुभेच्छा; व्हिडिओ देशभर व्हायरल

अजितदादांनी हे सांगितल्यानंतरही पत्रकारांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यामुळं ते भडकले. ‘मी मागे देखील सांगितलेलं आहे. इतरांनी काही केलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याबद्दल उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला ‘नो कमेंट्स’ म्हणण्याचा अधिकार आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. ‘तुम्हाला जसा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर न देण्याचा अधिकार आहे. ‘तुम्ही मला अनेक वर्षे ओळखता. मी जे काही सांगायचं ते सांगितलंय. त्यामुळं तुमचाही वेळ घालवू नका आणि माझाही वेळ घालवू नका. मला भरपूर कामं आहेत. एवढेच उद्योग नाहीत. मी सांगतो ते ऐकून घ्या, तुम्हाला तुमचंच खरं करायचं असेल तर मी उठून जातो, मग तुम्हाला काय चालवायचं ते चालवा, असं अजित पवार यांनी सुनावलं.

वाचा: माझी मतं पचण्यासारखी नाहीत, त्यामुळं कुणाला पटणार नाहीत: उदयनराजेSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: