राष्ट्रवादीला मोठा धक्का! अकोल्यात शहराध्यक्षाचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश


अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सलीम, युनुस यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे तेल्हारा शहरात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून असंख्य कार्यकर्तेदेखील वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार आहेत.

यावेळी लाल खा. पठाण, फीरोज खान केलेवाले, शेख ताजुद्दीन यांचासुद्धा वंचितमध्ये प्रवेश झाला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी तेल्हारा शहर अध्यक्ष विकास पवार, भारीप बमसं तेल्हारा महासचिव अशोक दारोकार, गजानन गवई, विजय तायडे, पुरषोत्तम अहिर, प्रभाकर अवचार, शंकरराव राजुस्कर, विक्कि तायडे, गजानन तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

खरंतर, आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात निवडणुकांच्या वादळामुळे राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशात आता अकोल्यामध्ये कुठेतरी वंचितची ताकद वाढताना दिसत आहे.
गृहमंत्री राहिलेला माणूसच भ्रष्टाचारात अडकलेला असेल तर… अण्णा हजारे अखेर बोलले!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: