Fuel Price: कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात पहिल्यांदाच घसरल्या; पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार?


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या आठवड्यात पहिल्यांदाच घसरल्या आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे क्रूडच्या किंमतीवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ८६ डॉलर प्रति बॅरलवरून खाली ८५ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे, पण देशांतर्गत तेल कंपन्यांनी शनिवारी (२३ ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली आहे. या आठवड्यातील बुधवारपासून दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे नवे दर पहिल्यांदाच १०७ रुपयांच्या पुढे गेले आहेत. पेट्रोल ३५ पैशांनी वाढून १०७.२४ रुपये प्रति लिटर झाले आहे. त्याचबरोबर डिझेलने ९५.९८ रुपये प्रति लिटर दर गाठला आहे.

मुंबईत पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी वाढ झाली असून ११३.०८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरातही ३४ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत १०३.९७ रुपये प्रति लीटर मिळत आहे.

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करताय; जोखीम आणि फायद्यांबद्दल जाणून घ्या
SGB 2021: गुंतवणूकदारांना सुवर्णरोखे खरेदीची ‘सुरक्षित’ संधी
कर कमी होणार का?

सरकार सध्या कर कमी करण्याची तयारी करत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कारण एक्साईज ५ रुपये प्रति लिटरने कमी केल्याने महागाईवर फारसा परिणाम होणार नाही. सरकारने संसदेत सांगितले होते की, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे कर संकलन ३.३५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एक वर्षापूर्वी याच काळात पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणारे कर संकलन १.७८ लाख कोटी रुपये होते, ते आता ३.३५ लाख कोटी झाले आहे.

सरकारने यामधून अधिक कमाई केली असती, पण लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधांमुळे वाहनांची वाहतूक बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी झाली, त्यामुळे करवसुलीही कमी झाली. २०१८-१९ मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी संकलन २.१३ लाख कोटी रुपये होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत सरकारला अबकारी संकलन म्हणून १.०१ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या महसूल प्रवाहात केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही, तर एटीएफ, नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल यांचा समावेश आहे. हे सर्व जोडून, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सरकारला एकूण ३.८९ लाख कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क संकलन मिळाले आहे.

महागड्या खाद्यतेलापासून मिळणार दिलासा; गृहिणींची दिवाळी गोड होणार
पैसे चुकीच्या अकाउंटमध्ये पाठवले? टेन्शन घेऊ नका; वाचा सविस्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: