कोरोना मुक्त पंढरपूरसाठी राबवण्यात आली सायकल रॅली

पंढरपूर कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला

पंढरपूर/नागेश आदापूरे – पंढरपूरमध्ये लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशाने व सायकलीचा जास्तीत जास्त नागरिकांकडून उपयोग व्हावा यासाठी माजी आरोग्य सभापती नगरसेवक विवेक परदेशी यांच्या संकल्पनेतून सायकल रॅली काढण्यात आली.

   सायकल रॅलीची सुरुवात युवा नेते प्रणव परिचारक, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,विवेक परदेशी ,सचीन कुलकर्णी, धर्मराज घोडके, दिपक येळे यांनी सायकल चालवून केली.आमदार प्रशांत परिचारक यांच्या सुचनेनुसार प्रभाग क्रं १६ मध्ये नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रणव परिचारक,सुनील वाळुजकर, नागेश भोसले यांच्या हस्ते परदेशीनगर येथे या लसीकरण केंद्राला सुरवात करण्यात आली. नगरसेवक विवेक परदेशी व नगरसेविका रेणुकाताई घोडके यांच्या नियोजनातुन २५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शिबीरात येणाऱ्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्टेशन करण्यात आले व शांततेत लसीकरण पुर्ण झाले.

    शासनाच्या सुचनेप्रमाणे१८ वर्षापुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करुन आपल्या परिवाराला सुरक्षीत करावे असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले व जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलीचा वापर करुन आपली शरीर संपत्ती मजबुत व मेंटेन करावी असे मान्यवरांच्यावतीने सांगण्यात आले.

याप्रसंगी शांताराम कुलकर्णी,विजय खंडेलवाल, डि.व्ही.कुलकर्णी, दिपक येळे, मिलींद येळे,अभय झांबरे, नागेश साळुंके, राउत, युवराज सलगर, पांडुरंग डोके, गणेश देसाई,आण्णा पाटील, नितीन डोफे,दत्ता धोत्रे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: