केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीची पावती म्हणून मतरूपी आशीर्वाद मिळावा -आमदार समाधान आवताडे

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मूलभूत सुविधा गावात आणण्यात यश मिळाले मा.आमदार प्रशांत परिचारक

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली असून आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने गावातील पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे व मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी तपकिरी शेटफळ या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार समाधान आवताडे यांनी राबवलेल्या योजना व विविध विकास कामांच्या व धोरणांच्या माध्यमातून झालेली गावातील लोककल्याणकारी विकास कामे मतदारांसमोर मांडली.

आपल्या मतदारसंघात विकासाभिमुख धोरण आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी महायुतीचा विजय महत्वाचा आहे, असं स्पष्ट प्रतिपादन समाधान आवताडे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना केलं.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मूलभूत सुविधा गावात आणण्यात यश मिळाले आहे. पुढील काळात अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने आणखी जोमाने काम करण्यासाठी २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषद मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.

सदर प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी,सहकारी कार्यकर्ते व शामराव सुडके, बाळकृष्ण सुडके यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.