शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे एकवीरा देवीच्या चरणी; जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी केली प्रार्थना
दर्यावरचे शूर विर तुझ्या पायाचे चाकर,तच कृपा तरी त्यासी त्यांना एकची आधार अशी शिवसेना व महायुतीसाठी आरती …डॉ.निलम गोऱ्हे

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: आज शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कार्ला येथील श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले.दर्यावरचे शूर वीर तुझ्या पायाचे चाकर, तच कृपा तरी त्यासी त्यांना एकची आधार असे शिवसेना संघर्षाचे वर्णन करून देवीला साकडे घातले आणि शिवसेनेच्या शूर सैनिकांना आशीर्वाद दे अशी प्रार्थना केली.

यावेळी डॉ गोऱ्हे यांनी देवीची विधीवत पूजा आरती करत देवीला महावस्त्र अर्पण केले व श्री एकवीरा आईने जनतेला कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश द्यावं असा आशीर्वाद मागितला तसेच राज्यातील महिला, युवक, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या कल्याणाकरिता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात पुन्हा येऊ दे अशी देवी चरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी, अनिल पडवळ,भाऊसाहेब माने,मारुती बोरकर, संतोष देवकर,विनोद देवकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.