patna serial blasts case : मोदींच्या हुंकार रॅलीत घडवले होते बॉम्बस्फोट, कोर्टात ९ जण दोषी


पाटणाः पाटण्यातील गांधी मैदानात ८ वर्षापूर्वी नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत एकामागून एक अनेक बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए कोर्टाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्याचबरोबर इतर सर्व ९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. सर्व आरोपींना येत्या १ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८७ जणांची कोर्टात सुनावणी झाली आहे.

पाटण्यातील गांधी मैदानातील बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी २७ ऑक्टोबर २०१३ ला पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ ला एनआयएने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आणि १ नोव्हेंबरला दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाइल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

nawab malik : ‘नवाब मलिकांसह महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर दाऊद इब्राहिमचा प्रभाव’, भाजप नेत्याचा घणाघात

आणखी एका गुन्ह्यात ५ जणांना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणातील आरोपी ५ दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये उमर सिद्दीकी, अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम उर्फ पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उर्फ अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहम्मद आलम उर्फ पप्पू मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी ऊर्फ आलम यांचा समावेश आहे. यापैकी इम्तियाज, उमर, अझहर, मोजिबुल्ला आणि हैदर यांनाही बोधगयामधील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Tripura: ‘विहिंप’च्या रॅली दरम्यान मशीद, घरांची तोडफोड; दुकानं पेटवलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: