निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या हेलिकॉप्टर ची केली तपासणी

मुंबई / पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पुण्यातून हेलिकॉप्टर ने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला महाविद्यालय येथील हेलिपॅड वर उतरले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या सोबत आणलेल्या बॅगांची तपासणी करण्यासाठी हेलिकॉप्टर ची तपासणी केली.

यावेळी ना.रामदास आठवले यांच्या सोबत एकही बॅग नव्हती.होती ती केवळ सुक्या भेळ ची थैली.यावेळी ना. रामदास आठवले यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून हेलिकॉप्टर ची तपासणी आणि आपली ही तपासणी करण्याची तयारी दर्शवली.यावेळी हेलिकॉप्टर मध्ये कोणतीही बॅग नव्हती.फक्त भेळ आणलेली कागदी पिशवी होती.
यावेळी ना.रामदास आठवले यांच्या समवेत शिवसेना चे प्रवक्ते राजू वाघमारे,वैभव बोराडे,रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव परशुराम वाडेकर,प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे आदी उपस्थित होते.

सांगोला येथे ना.रामदास आठवले यांचे आगमन झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष राजाभाऊ सरवदे,सुनील सर्वगोड,सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते आदींसह अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सांगोला हेलिपॅड येथे मोठी गर्दी केली होती.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.