female player filed a case of sexual abuse : आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर नेत्याने केला बलात्कार; अटकेनंतर तुरुंगात रवानगी


रांचीः एका आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील भाजप नेता संजय मिश्रा याच्यावर पीडित महिला खेळाडूने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी चक्रधरपूर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल दाखल झाल्यानंतर भाजप नेता संजय मिश्रा याला पोलिसांनी अटक केली. मिश्राची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पीडित महिला खेळाडून आपला जबाब चाईबासा कोर्टात नोंदवला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. शहरातील सागर नावाचा एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बोलावून संजय मिश्राने आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यापासून आपल्यावर मिश्रा हा सातत्याने बलात्कार करत होता, असं असा आरोप पीडित महिलेने एफआयआरमध्ये केला आहे.

आरोपी भाजप नेता संजय मिश्रा हा गेल्या एप्रिलपासून पीडित महिला खेळाडूला ब्लॅकमेल करत होता. तसंच मिश्राने महिला खेळाडूसोबत काही अश्लील फोटोही काढले होते. हे फोटो दाखवून तो महिला खेळाडूला सतत ब्लॅकमेल करत होता. फोटो उघड करण्याची धमकी देऊन तो एका स्थानिक हॉटेलवरवर पीडित महिला खेळाडूला बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. ही बाब संजय मिश्रा याच्या पत्नीला कळल्यावर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले, अशी माहिती समोर आली आहे.

Chattisgarh: सरकारी कार्यालयात घुसून आमदाराची गुंडागर्दी, कर्मचाऱ्याचा डोळा फोडला

पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरोधात केला गुन्हा दाखल

पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू ही आपल्या आईसोबत सोमवारी चक्रधरपूर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर भाजपचा जिल्हा माध्यम प्रमुख असलेल्या संजय मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पीडित महिला खेळाडूच्या तक्रारीनंतर आरोपी संजय मिश्रा याची चौकशी केली गेली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय लिंडा यांनी दिली. प्राथमिक चौकशीत संजय मिश्रावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आलं. तसंच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संजय मिश्राने दिली होती. पीडित महिला खेळाडूने केलेल्या या आरोपातही तथ्य आढळून आल्याचं पोलीस उपअधीक्षक दिलीप खालको यांनी सांगितलं.

बापरे! मेट्रो स्टेशनवर प्रवाशाकडून ५८ लाखांची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

‘सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही’

तुरुंगात रवानगी होण्यापूर्वी आरोपी संजय मिश्रा याने व्हिडिओद्वारे एक वक्तव्य जारी केले आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही’, असं त्याने व्हिडिओत म्हटलं आहे. आपले विरोधक कुठल्याही थराला जावून आपला पराभव करण्यासाठी काहीही करत आहेत. आपल्याविरोधात हा अतिशय घाणेरडा कट रचण्यात आला आहे. आपला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. प्रशासनाने आपले सर्व कॉल रेकॉर्ड्स तपासावे. एवढचं नव्हे तर हॉटेलमधील रजिस्टर तपासावं. सीसीटीव्ही फुटेज बघावं. आपण तिथे नव्हतोच. पोलीस प्रशासन कुठलाही पक्षपात न करता चौकशी करेल, असा आपल्याला विश्वास असल्याचं संजय मिश्राने व्हिडिओत म्हटलं आहे.

या घटनेची माहिती आगीसारखी पसरली. या संपूर्ण घटनेची माहिती जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांना दिली आहे. या घटनेनंतर संजय मिश्रा यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार का? याकडे आता सर्वांच लक्ष आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: