आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अस म्हणत लढण्या साठीचे बळ देत उर्जा वाढवली- रणजितसिंह नाईक निंबाळकर

सोनंद ता.सांगोला येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गावभेट दौरा

सोनंद,ता.सांगोला /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- सोनंद ता.सांगोला येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ग्रामस्थांनी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अस म्हणत लढण्यासाठीचे बळ देत उर्जा वाढवली असे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी सांगोला मतदार संघाचे आ.शहाजी बापू पाटील, मा.आ.दीपक साळुंखे पाटील, भाऊसाहेब रुपनर, नागणे ताई, जिल्हाध्यक्ष भाजपा (सोलापूर ग्रामीण प.) चेतनसिंह केदार सावंत, अतुल मालक, दुर्योधन हिप्परकर, नवनाथ पवार, शिवाजीराव गायकवाड,विजय बाबर,जि प सदस्य जगदीश बाबर, देशमुख सर, अमोल यादव, चंद्रकांत देशमुख, संजय काशीद, प्रशांत कोळसे पाटील, ॲड.समाधान काशीद, बाळासाहेब खंडागळे, आबासाहेब बाबर, नवनाथ फडतरे, धनसिंग चव्हाण आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *