puneeth rajkumar : अभिनेते पुनीत राजकुमार यांचे निधन; PM मोदी, राहुल गांधींकडून शोक व्यक्त


नवी दिल्लीः प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनावर देशातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही ट्विट करून अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पॉवर स्टार पुनीत राजकुमार, जे दिवंगत प्रसिद्ध कन्नड स्टार राजकुमार अवरगल यांचे पुत्र होते. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक दशकांपासून सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे, असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “नियतीच्या एका क्रूर वळणाने आमच्याकडून प्रतिभावान अभिनेता पुनीत राजकुमार हिरावून घेतला. जाण्याचे वय नव्हते. येणाऱ्या पिढ्या त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वासाठी त्यांची आठवण ठेवतील.” तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी हे ट्विट केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे. ‘कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी मनःपूर्वक संवेदना…. खूप लवकर गेले’, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर शुक्रवारी ४६ वर्षीय राजकुमार यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी ११.४० आपत्कालीन विभागात आणण्यात आलं होते. ते कुठलाही प्रतिसाद देत नव्हते आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. पुनीत हे दिवंगत अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होते. चाहत्यांमध्ये ते अप्पू या नावाने लोकप्रिय होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: