जालन्याचे माजी खासदार पुंडलिक दानवे यांचे निधन, राजकारणात शोककळा


जालना : लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्री.पुंडलिक हरी दानवे यांचे दि.०१.११.२०२१ रोजी, सकाळी १०.०० वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण राजकारणातून हळहळ व्यक्त होत आहे.

एक प्रामाणिक देशभक्त, निष्कलंक माजी खासदार, महाराष्ट्रातील व देशातील जुनं जाणतं तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. सोमवारी सकाळी दहा वाजता निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी मूळगाव पिंपळगाव (सुतार) (ता.भोकरदन जि.जालना ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नागरिकांनो! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्त्वाच्या सूचना, दिवाळी साजरी करण्याआधी व्हा अलर्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: