विराट तुला याचे उत्तर द्यावे लागले; पाहा कोणी विचारला प्रश्न


नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत निराशजनक राहिला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडने ८ विकेटनी पराभव केला. त्याआधी पाकिस्तानने १० विकेटनी पराभव केला होता. या दोन पराभवामुळे भारताचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले आहे. आता अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करण्याचा चमत्कार केला तरच भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

वाचा- पराभवानंतर विराटच्या कुटुंबियांना धमकी; या खेळाडूचा धक्कादायक दावा

न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी संघावर जोरदार टीका सुरू केली आहे. सोशल मीडियावरून अनेक जण राग व्यक्त करत आहेत. अशात काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

टीम इंडियाच्या कामगिरीवर बोलताना थरुर म्हणाले, आम्ही त्यांचा आदर केला, कौतुक केले आणि त्यांचा सन्मान देखील केला. आम्हाला त्यांनी पराभूत होण्याचे वाईट वाटत नाही. पण दु:ख या गोष्टीचे वाटते की ते लढले देखील नाहीत. कर्णधार विराट कोहलीला आम्ही हे सांगण्याची गरज नाही की, काय चुकले. पण त्याला आपल्याला हे सांगावे लागेल की असे का झाले?

वाचा- जिंकणार तरी कसे? दोन सामन्यात फक्त २ विकेट घेतल्या

वाचा- Video : भारताच्या पराभवानंतर वसीम अक्रम-वहाबचा डान्स; आफ्रिदी-अख्तरनेही काढले चिमटे

टी-२० वर्ल्डकपला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये होता. पण आता मात्र भारत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल का याबाबत शंका आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा १० विकेटनी पराभव झाला. पाकिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये झालेला भारताचा हा पहिला पराभव आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध देखील भारताचा पराभव झाला. आता भारताच्या ३ लढती शिल्लक असून त्या अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: