विकृतीचा कळस; ट्रेनमध्ये घुसून १७ प्रवाशांवर केले वार; अख्खा डबा दिला पेटवून


हायलाइट्स:

  • माथेफिरूनं ट्रेनमध्ये घुसून १७ प्रवाशांना भोसकलं
  • टोकियोतील धक्कादायक घटनेने खळबळ
  • प्रवाशांवरील हल्ल्यानंतर ट्रेनचा डबा पेटवून दिला
  • जखमी १७ प्रवाशांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

टोकियो: एका माथेफिरूने ट्रेनमध्ये चढून डब्यातील १७ प्रवाशांवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर ट्रेनच्या डब्याला आग लावून दिली. टोकियोमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी ही माहिती दिली असून, या घटनेत किमान १७ जण जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

तेथील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोराला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे. त्याचे वय साधारण वीसच्या आसपास असावा, असा अंदाज आहे. त्याच्याबद्दल फार काही माहिती यंत्रणांना मिळू शकलेली नाही. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आय एम सॉरी मम्मी-पप्पा!; पत्र लिहून १५ वर्षांच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल
अमरावती जिल्हा हादरला; २० वर्षीय तरुणीवर अत्याचार, त्रासाला कंटाळून तिने…

टोकियो पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना कोकुरयो स्थानकाजवळ केइयो ट्रेनमध्ये घडली. हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. घटना घडली त्यावेळी अनेक प्रवासी सैरावैरा पळत असताना व्हिडिओमध्ये दिसत होते. हल्लेखाराने डबा पेटवून दिल्यानंतर ती आग पसरली आणि शेजारील डब्यापर्यंत पसरली. त्यामुळे त्या डब्यातील प्रवासी देखील घाबरून खिडकीतून उड्या मारत होते. हल्लेखोराने अनेक प्रवाशांवर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर द्रवपदार्थ टाकून डबा पेटवून दिला.

धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना; पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेवर ओढवला भयानक प्रसंग
दोन महिन्यांतील दुसरी घटना

टोकियोमध्ये ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. याआधी ऑगस्टमध्येही अशीच घटना घडली होती. टोकियो ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्याच्या आदल्या दिवशी ३६ वर्षीय तरुणाने टोकियोमध्ये ट्रेनमध्ये १० प्रवाशांवर चाकूने वार केले होते. या घटनेचा तपास केला असता, एका महिलेवर हा हल्ला करायचा होता, असे संशयिताने त्यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: