ती महागडे घड्याळे तर…; मलिकांच्या आरोपांवर यास्मिन वानखेडे स्पष्टच बोलल्या


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकद एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करत नवीन सवाल उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे यांच्याकडे महागडे कपडे व लाखोंची घड्याळे कशी?, असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला होता. त्यावर आता समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे (Yasmin Wankhede) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण वानखेडे हे रोज नवनवे कपडे वापरतात. ते ज्या ब्रँडची शर्ट वापरतात, त्यांची किंमत ५० हजारपेक्षा जास्त असेत. ३० हजारांपासून सुरू होणारे टी-शर्ट वापरतात. ७० हजारांची पँट वापरतात. पाच लाखापर्यंतची वेगवेगळी ब्रँडेड घड्याळं वापरतात, अडीच ते तीन-तीन लाख रुपये किंमतीचे बेल्ट वापरतात. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांच्या या दाव्यावर यास्मिन वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

वाचाः सुजय विखेंनी लावला भाजप-सेना युतीचा फटाका; आता शिवसेना म्हणते…

यास्मिन वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहे. ‘आमच्या आईने समीर व मला ती घड्याळं गिफ्ट दिली आहेत. सतरा वर्षांपूर्वीची ती घड्याळे आहेत, असं यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे. तर, समीर वानखेडे वर्षांतून एकदाच खरेदी करतात आणि तेच कपडे ते पूर्ण वर्षभर वापरतात. त्यांना काय खरेदी करायचे आहे याची ते आधीच यादी करुन ठेवतात,’ असं यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

नवाब मलिकांनी केलेला हा दावा समीर वानखेडेंनी फेटाळून लावला आहे. माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर ही फक्त एक अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी याविषयी खरी माहिती शोधून काढायला हवी, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

वाचाः लाखो रुपयांची घड्याळे, महागडे कपडे?; नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंनी दिले उत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: