GOA NEWS:गेल्या आठवड्यात गोव्याच्या वायव्येकडील समुद्रात भारतीय नौदलाची पाणबुडी आणि मासेमारी बोट यांची टक्कर झाली. या धडकेनंतर मासेमारी जहाजातील 11 जणांना वाचवण्यात यश आले. त्याचवेळी २ जण बेपत्ता झाले होते. तेव्हापासून दोघांची शोधमोहीम सुरू होती. आता या दोघांचेही मृतदेह गोव्याच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातून सापडले आहेत.
मार्थोमा असे नाव असलेल्या या मासेमारीच्या बोटीत 13 जणांचा क्रू होता. गोव्याच्या किनाऱ्यापासून 70नॉटिकल मैल दूर भारतीय नौदलाच्या पाणबुडीशी मार्थोमा टक्कर झाली. अकरा जणांना वाचवण्यात यश आले आणि दोघांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, दोघांचा जीव वाचू शकला नाही. नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि ओएनजीसी यांच्या संयुक्त कारवाईत या दोन्ही क्रू मेंबर्सचे मृतदेह गुरुवारी बोटीच्या ढिगाऱ्याजवळील समुद्राच्या तळातून बाहेर काढण्यात आले.हे मृतदेह अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
Edited By – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.