अहिंसा पतसंस्था नेहमी सभासदांचे हित पहाते- गोल्डन मॅन शंकर विरकर

अहिंसा पतसंस्था नेहमी सभासदांचे हित पहाते -लॉकर पूजन प्रसंगी गोल्डन मॅन शंकर विरकर यांचे मनोगत

म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता.माण जि. सातरा येथील अहिंसा पतसंस्थेत लॉकर पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नितिन दोशी होते.मीरा भाईंदर येथील भाजपा नेते शंकर विरकर यांचे हस्ते फित कापून लॉकर पूजन करण्यात आले.

यावेळी गोल्डनमॅन शंकर विरकर,चेअरमन नितिन दोशी, सिद्धनाथ पतसंस्थेचे माजी संचालक नारायण माने,अशोक नामदे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोल्डन मॅन शंकर विरकर म्हणाले की, अहिंसा पतसंस्थेचे नेहमी सभासदांच्या हिताचे उपक्रम सुरु असतात.संस्थेचे उत्पन्न वाढले तर संस्था आर्थिकदृष्टया बळकट होते व कर्मचाऱ्यांचाही आर्थिक विकास होतो यासाठी कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजा मध्ये प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. अहिंसा पतसंस्थेच्या चौफेर प्रगतीसाठी श्री विरकर यांनी शुभेच्छा दिल्या व सभासदांनी लॉकर सुविधेचाचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी म्हणाले आज दुग्धशर्करा योग आहे. लॉकर ची सुविधा सोने व इतर चीज वस्तू ठेवण्यासाठी असते व लॉकर चे पूजन ज्यांची ओळख गोल्डन मॅन अशी आहे ते मीरा भाईंदर चे भाजपा नेते शंकर विरकर यांचे हस्ते होत आहे याचा आम्हा सर्वाना आनंद आहे.बनगरवाडी सारख्या ग्रामीण भागातून जाऊन मीरा भाईंदर येथे सामाजिक काम करत राजकीय क्षेत्रात भरारी शंकरभाईंनी घेतली असून आमची नेहमीच एकमेकांना साथ असते. त्यांच्या अंगावरच नुसते सोने नाहीतर त्यांचे मनही सोन्यासारखे आहे.त्यांचे कार्य यापुढेही सुवर्ण अक्षरांत लिहण्यासारखे व्हावे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ,प्रशांत आहेरकर, महेश पतंगे,नीरज व्होरा, अमजद मुजावर, नाना मासाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले. आभार मनोज शिंदे यांनी मानले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading