नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- आज बुधवार दि.१७/०७/२०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या औचित्यावर शिवसेना सचिव व नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व मंदिरे समिती सदस्य ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिरे समिती कर्मचारी…

Read More

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन….खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर येथे दिले. पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जुलै २०२४- आषाढी वारी निमित्त शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे दिले. यावेळी शिष्टमंडळात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे…

Read More

वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजास न्याय द्यावा – मनसे नेते दिलीप धोत्रे

वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजास न्याय द्यावा – मनसे नेते दिलीप धोत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र महामंडळासाठी सकारात्मक प्रतिसाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- महाराष्ट्रातील वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजास न्याय द्यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना मनसे नेते दिलीप धोत्रे,शिवसेना सोलापूर…

Read More

इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सक आंदोलनाच्या तयारीत

स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मात्र बोगस वैद्यकीय व्यवसाय ठरवून गुन्हे गंभीर दाखल केले जात आहेत पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- राज्यातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी वैद्यकीय व्यवसायास परवानगी दिलेली असतानाही स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मात्र बोगस वैद्यकीय व्यवसाय ठरवून गुन्हे गंभीर दाखल केले जात आहेत. या अन्यायास वाचा फोडण्यासाठी 22 जुलै 2024 पासून…

Read More

शासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद वारी हा उपक्रम महत्त्वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संवाद वारी सारख्या उपक्रमातून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचीप्रचार प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणावर होत आहे माहिती व जनसंपर्क विभाग शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले करत आहे सोलापूर, दि.16 (जिमाका)- माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी संवाद वारी’ हा उपक्रम राबवला जात आहे.या माध्यमातून राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…

Read More

कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांना या क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी पंढरी महोत्सव-२०२४ या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांना या क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी उपयुक्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे सर्व सामान्य व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६: कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात…

Read More

विठ्ठल दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी मंजूर – आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी मंजूर पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाच्या निधीतून सुरू असलेली कामे उत्कृष्ट आहेत पंढरपूर, दि.17- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचे वातावरण…

Read More

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा वरील अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत,जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई,दि.१६ :- डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला.या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन पंढरपूर,दि.१६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री…

Read More

महापूजेपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी

महापूजेपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17- आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी अनेक सोयी सूविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाद्वार, कुंभार घाट व विठ्ठल…

Read More
Back To Top