सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

सोलापूर शहर व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे काम अधिक मजबुतीने करून येणाऱ्या काळातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीला यशस्वीरित्या सामोरे जाणार असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top