वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

कासेगांव ग्रामपंचायत च्यावतीने विविध वस्तुंचे वाटप

कासेगांव/शुभम लिगाडे/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१८ जुलै २०२५- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कासेगांव येथे नागरी सत्कार व ग्रामपंचायत कासेगांव च्यावतीने विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले.

आंब्याची झाडे,कचरा कुंडी,गरजु विद्यार्थींना सायकल वाटप करण्यात आले तर गावात विविध ठिकाणी 150 सोलर पथदिवे बसवण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास माढा चे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत,अमर पाटील, नागेश फाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत कासेगांव च्यावतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सरपंच व उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व वसंतराव देशमुख समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top