शरद पवार वाढदिवसानिमित्त माढ्यात महाआरोग्य शिबिर ५१० रुग्णांना लाभ

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात महाआरोग्य शिबिर ५१० रुग्णांना लाभ

आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून माढ्यात भव्य आरोग्य शिबिर संपन्न

माढा /ज्ञानप्रवाह न्यूज : देशाचे ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून माढा ग्रामीण रुग्णालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत तब्बल ५१० रुग्णांनी सहभाग नोंदविला.

या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग व गर्भवती महिलांची तपासणी, बालरोग तपासणी व समुपदेशन, त्वचारोग, सामान्य औषधोपचार, मोतीबिंदू व नेत्र तपासणी आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. सर्व रुग्णांना आवश्यक औषधे मोफत देण्यात आली.

आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर योजनांतून सुमारे ३ कोटी रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी आमदार अभिजीत पाटील यांचे आभार मानले.

कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख,तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,विनंती कुलकर्णी,जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे,संजय पाटील,आनंद कानडे, हरिभाऊ रणदिवे, बापूसाहेब जाधव, राम मस्के,ऋषिकेश तांबिले,आबासाहेब साठे, बापू तांबिले,सावली बंगाळे,अश्विनी लोकरे तसेच वैद्यकीय अधिष्ठता डॉ.मेमाणे,डॉ.अमित भोसले,डॉ.रणजीत ढोले,डॉ.सुजित गायकवाड,डॉ.पांडुरंग जगताप,डॉ.आलेकर, डॉ.बांगर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉक्टर व नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जन्मजात बहिरेपणा तपासण्यासाठी आवश्यक असलेले शिशुकर्णदोष किट माढा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील नवजात शिशु व लहान बालकांच्या बहिरेपणाचे वेळेत निदान होऊन शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य होणार आहेत. याबद्दल वैद्यकीय अधिष्ठता डॉ. मेमाणे यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Back To Top