महाराष्ट्रातील यशस्वी योजना बिहारमध्ये राबवणार – IAS अधिकारी vikram विक्रम विरकर यांचा निर्धार

महाराष्ट्रातील यशस्वी योजना बिहारमध्ये राबवणार – IAS अधिकारी vikram विक्रम विरकर यांचा निर्धार

विरकर पॅटर्न देशासाठी आदर्श ठरेल; अहिंसा पतसंस्थेच्या सत्कार समारंभात IAS विक्रम विरकर यांचे प्रतिपादन

IAS अधिकारी विक्रम विरकर यांनी महाराष्ट्रातील प्रभावी योजना बिहारमध्ये राबवून राज्याचा लौकिक वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला. अहिंसा पतसंस्थेच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी प्रशासनातील अनुभव मांडला.

म्हसवड | ज्ञानप्रवाह न्यूज:Bihar Education Director IAS Virkar Pattern Scheme प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील यशस्वी योजना बिहारमध्ये राबवून महाराष्ट्राचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन IAS अधिकारी तथा बिहार राज्य प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक IAS Vikram Virkar विक्रम विरकर यांनी केले.

अहिंसा पतसंस्थे Ahinsa Patsanstha Mhaswad च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, बाहेरच्या राज्यात प्रशासनात काम करत असताना माणदेशी म्हणून आपल्या भागातून जे प्रेम मिळते तीच माझी खरी ऊर्जा आहे. अहिंसा पतसंस्थेने घेतलेला हा सत्कार निश्चितच प्रेरणादायी आहे.
विरकर पुढे म्हणाले की,अधिकारी पदावर काम करत असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. शेतकरी कुटुंबातून आलो असल्यामुळे सामान्य माणसाच्या व्यथा मला जवळून माहिती आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काही प्रभावी योजना बिहारमध्ये राबवून त्या यशस्वी करायच्या आहेत.

यावेळी जगन्नाथ विरकर गुरुजी यांनी सांगितले की,अहिंसा पतसंस्था ही नावाजलेली संस्था असून, माझे चिरंजीव विक्रम विरकर जबाबदारीच्या पदावर असतानाही मातीतली नाळ विसरलेले नाहीत. बिहारमधील जनतेत ते समरस झाले आहेत म्हणूनच ते लोकप्रिय अधिकारी ठरले आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी शाल व भेटवस्तू देऊन IAS विक्रम विरकर यांचा सत्कार केला. तसेच उपस्थितांचे स्वागत केले.

नितीन दोशी हे बोलताना म्हणाले की, मुजफ्फरपूर महापालिकेत आयुक्त पदावर विरकर साहेबांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या निरोप समारंभात जनतेने दाखवलेले प्रेम हे त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.
नुकताच त्यांनी बिहार राज्य शिक्षण विभागाच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला असून या विभागात नाविन्यपूर्ण योजना राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा. हीच योजना पुढे देशभरात विरकर पॅटर्न म्हणून राबवली जावी, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला गुलाब विरकर,युवा उद्योजक संग्राम विरकर,आकाश विरकर, पतसंस्थेचे व्यवस्थापक दीपक मासाळ, उपव्यवस्थापक प्रशांत आहेरकर,कर्मचारी – अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले.आभार आनंदा विंगेत यांनी मानले.

Leave a Reply

Back To Top