भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे मतदान जनजागृती Vote Awareness व शपथ कार्यक्रम उत्साहात संपन्न
मतदान म्हणजे लोकशाहीचा lokshahi कणा – भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलची प्रभावी जनजागृती मोहीम
Solapur news : सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज : लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भावसार व्हिजन इंडिया bhavsar vision india सोलापूर सेंट्रल या सामाजिक संस्थेच्या वतीने चार पुतळा पार्क चौक तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रॅक येथे मतदान जनजागृती व शपथ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमास सकाळी फिरायला येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.मतदान voting हा केवळ हक्क नसून देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने निर्भयपणे कोणत्याही आमिषाला अथवा दबावाला बळी न पडता मतदान करणे अत्यावश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी सामूहिकरित्या मी भारताचा जबाबदार नागरिक म्हणून जात,धर्म, पैसा किंवा कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य व पात्र उमेदवारास मतदान करीन आणि लोकशाही अधिक सक्षम करीन अशी मतदान शपथ घेतली. शपथेनंतर अनेक नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीत नक्की मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या जनजागृती मोहिमेत भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचे सर्व संचालक मंडळ, व्हिजन सदस्य व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष सुशील महिंद्रकर यांनी उपस्थितांचे स्वागत करताना, मतदान न केल्यास आपल्या भविष्यातील निर्णय इतरांच्या हाती जातात, त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे,असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे सचिव इंजि.सागर पुकाळे यांनी उपस्थित नागरिक, सदस्य व सहकाऱ्यांचे आभार मानले.या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून येणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




