नारायण चिंचोलीतील प्राचीन सूर्यनारायण मंदिरात भाविन्य पाटणकर ,प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी घेतले दर्शन
पंढरपूर तालुक्यातील हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरात suryanarayan mandir भाविकांची गर्दी : भाविन्य पाटणकरांनी घेतले दर्शन
Pandharpur news पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या प्राचीन सूर्यनारायण देवाच्या suryanarayan dev यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून ही यात्रा संपूर्ण महिनाभर चालणार आहे. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी या यात्रेला संपूर्ण जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देवाचे मंदिर हे अत्यंत प्राचीन व दुर्मिळ हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील असून महाराष्ट्रातील एकमेव सूर्यनारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व विशेष आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर यांचे बंधू भाविन्य पाटणकर हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आले असता त्यांना या सूर्यनारायण मंदिराची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नारायण चिंचोली येथे भेट देत सूर्यनारायण देवाचे दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचा इतिहास, वास्तुशैली व यात्रेची परंपरा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी सूर्यनारायण देवस्थान ट्रस्ट व ग्राम प्रशासनाच्या वतीने भाविन्य पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मस्के तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष माऊली हळणवर, भाजपा पंढरपूर तालुका सरचिटणीस विजयकुमार मोरे, महादेव केदारे, सचिन टिळेकर, महेश धुमाळ, तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर,पंकज देवकते, वैजनाथ मस्के, माजी सरपंच नितीन मस्के,पत्रकार मारुती वाघमोडे,पत्रकार तानाजी सुपकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सिताराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे यांनीही सूर्यनारायण देवाचे दर्शन घेतले.

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्राचीन हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर यांचे बंधू भाविन्य पाटणकर तसेच सिताराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे यांनी दर्शन घेतले.



