आदर्श पालकत्वाचा गौरव : आरोग्यदूत मंगेश चिवटे arogyadoot mangesh chivate यांच्या आई-वडिलांना राजपिता शहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार rajpita shahajiraje adarsh palak purscar
संस्कारांची शिदोरी घडवते राष्ट्रसेवक पिढी : चिवटे दाम्पत्याचा आदर्श पालक पुरस्काराने सन्मान

Pune purscar news : पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.११/०१/२०२६ : राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समिती च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या आई- वडिलांचा गौरव करण्यात आला.
सौ.मंदाकिनी नरसिंह चिवटे व नरसिंह मनोहरपंत चिवटे यांना राजपिता शाहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नरसिंह मनोहरपंत चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य, महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्स डीलर्स असोसिएशनचे संचालक तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यभरात सत्य, प्रामाणिकपणा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपली. त्यांच्या सामाजिक, पत्रकारितेतील व संघटनात्मक कार्याचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडलेला आहे.
सौ.मंदाकिनी चिवटे यांनी कुटुंबसंस्कार, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सामाजिक संवेदनशीलता जपत आदर्श माता म्हणून कुटुंबाची घडण केली. त्यांनी दिलेल्या संस्कारांतूनच सामाजिक जाणिवा असलेले राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व घडले आहे.

राजपिता शाहाजी राजांनी ज्या आदर्श संस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्याच प्रेरणादायी मूल्यांवर आधारित संस्कार चिवटे दाम्पत्यांनी आपल्या मुलांवर केले. त्या संस्कारांतून घडलेले आरोग्यदूत मंगेश चिवटे आज महाराष्ट्रभर आरोग्यसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करत असून समाजात त्यांचा आदराने उल्लेख केला जात आहे.
हा पुरस्कार केवळ एका कुटुंबाचा गौरव नसून संस्कार, त्याग,सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा सन्मान आहे. चिवटे दाम्पत्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची ही योग्य दखल असून हा सन्मान समाजातील प्रत्येक पालकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या आई-वडिलांना पुणे येथे राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समितीतर्फे राजपिता शाहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.




