पंढरपूरातील सराईत गुन्हेगार संग्राम देवकुळे दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार
शरीराविरुद्ध गुन्ह्यांवर पोलिसांचा मोठा प्रहार; संग्राम देवकुळेवर तडीपारीची कारवाई
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्ध गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार संग्राम दिलीप देवकुळे रा.३२ खोली बडवेचर झोपडपट्टी संतपेठ पंढरपूर याच्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलत दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे.
पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(ब) अंतर्गत तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर विभाग यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल पडताळणी करून उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी संबंधित आरोपीस दोन वर्षांसाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे पंढरपूर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी शहरातील इतर सराईत गुन्हेगारांवरही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर,सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भापोसे)यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई नितीन जगताप, सपोफौ.कल्याण ढवणे,पोलीस नाईक सचिन इंगळे,पोहवा पकाले,पोकॉ हर्षद ठाकर, दिपक नवले तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीणचे अनिस शेख व सायबर सेलचे रतन जाधव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.







