१००% गुणांसह अथर्व अमित वाडेकरची राज्यात अव्वल कामगिरी; द.ह.कवठेकर प्रशालेचा ९४% निकाल

१००% गुणांसह अथर्व अमित वाडेकरची राज्यात अव्वल कामगिरी; द.ह.कवठेकर प्रशालेचा ९४% निकाल

पंढरपूर येथील द. ह.कवठेकर प्रशालेत मार्च २०२६ एसएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला. अथर्व अमित वाडेकरने १००% गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून प्रशालेचा निकाल ९४ टक्के लागला.

पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह. कवठेकर प्रशालेत मार्च २०२६ माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवठेकर,मानद सचिव एस.आर. पटवर्धन सर,पदाधिकारी एस.पी. कुलकर्णी सर, डॉ.मिलिंद जोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ.रा.ज. व्हनमाने, प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक जे. एम.शेलार सर तसेच शिक्षक शिक्षकेत्तर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत परीक्षेतील प्रशालेचा ९४ टक्के निकाल जाहीर करत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा, हार, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये चि. अथर्व अमित वाडेकर यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. सान्वी सचिन कलढोणे (९९.६०%), चि. सार्थक सिध्देश्वर लेंगरे (९९.२०%), कु. धनश्री राहुल लिगाडे (९७.४०%) आणि कु. सई महेश तेंडुलकर (९७.२०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

सत्कारप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि प्रशालेचे शैक्षणिक वातावरण महत्त्वाचे ठरल्याची भावना व्यक्त केली.

संस्थेचे मानद सचिव एस.आर.पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्य, परिश्रम, शिस्त आणि संस्कार यांच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एम. कुलकर्णी सर यांनी केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक समीर दिवाण यांनी केले.

Leave a Reply

Back To Top