पाणपोई, वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन व बेघरांसाठी अन्नदान; स्व. राजाराम नाईकनवरे यांना भावपूर्ण अभिवादन

स्व. राजाराम नाईकनवरे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पाणपोई, वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन व बेघरांसाठी अन्नदान; स्व. राजाराम नाईकनवरे यांना भावपूर्ण अभिवादन

पंढरपूरातील ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते स्व. राजाराम नाईकनवरे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पाणपोई, वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन, बेघरांसाठी अन्नदान आदी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर संतपेठ येथील ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते स्वर्गीय राजाराम नाईकनवरे उर्फ दादा यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्व.राजाराम नाईकनवरे यांनी सामाजिक,राजकीय,कला,क्रीडा, सांस्कृतिक,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करत संतपेठ परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

गोरगरिबांप्रती प्रेम, दयाळू स्वभाव आणि सर्व समाजांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरली.देशसेवा हीच समाजसेवा हा संदेश देत त्यांनी आयुष्यभर समाजहितासाठी कार्य केले. त्यांचा हसतमुख व मनमिळाऊ स्वभाव प्रत्येकाच्या मनात घर करून गेला होता.

स्व.राजाराम नाईकनवरे यांना देशाबद्दल विशेष अभिमान होता. त्यांच्या मुलांमध्येही त्यांनी उत्तम संस्कार रुजवले. एक मुलगा देशाच्या सीमेवर भारतमातेचे रक्षण करत असताना दुसरा समाजसेवे साठी अहोरात्र कार्यरत असल्याचा अभिमान उपस्थितांनी व्यक्त केला.

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिष्ठान, सामाजिक संस्था व मित्रपरिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. पंढरपूर शहरातील वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पाणपोई सुरू करण्यात आली.

गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात वृद्ध माता- पित्यांसाठी मिष्टान्न भोजन व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याशिवाय माऊली शहरी बेघर निवासीस्थानी नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा.दत्तात्रय कांबळे यांनी केले.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल दादा सावंत (भैरवनाथ शुगर समूह उद्योग चेअरमन), डॉ.सौ.प्रणिताताई भालके (नगराध्यक्षा पंढरपूर नगरपालिका),डॉ.शुभम आगवणे (पंचायत समिती सभापती),कॅप्टन प्रदीपकुमार मोरे,इंजिनीयर नागनाथ पांढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, दयानंद वायदंडे, दिलीप देवकुळे, अंबादास वायदंडे, श्याम गोगाव, कृष्णा वाघमारे, दीपक नाईकनवरे, डॉ.शेळके, भीमराव वाघमारे, शैलेश आगवणे, उमेश सर्वगोड, किरण माळवदे, औदुंबर कांबळे, बापू खिलारे, सुखदेव माने, रतन नदाफ, हिरालाल रणदिवे, धनाजी लोखंडे, ब्रह्मदेव वायदंडे, अमित वायदंडे, राहुल नाईकनवरे, सुदाम खिलारे, सागर नाईकनवरे, अतुल वाघमारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे आयोजन स्व.राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान, संतपेठ पंढरपूर व सामाजिक संस्था आणि मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक राजाराम नाईकनवरे यांच्यासह मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Back To Top