सोलापूर विधानपरिषद निवडणूक : पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांचे एकजुटीने मतदान
पंढरपूरमध्ये मतदानाचा उत्साह; तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित शक्ती प्रदर्शन

पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ जून २०२६ : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एकजुटीचे दर्शन घडवत आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत,मर्चंट बँकेचे माजी चेअरमन तथा नगरसेवक नागेश भोसले, नगरसेवक संजय बंदपट्टे, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण राज घाडगे, माजी नगरसेवक सुधीर धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच नगरसेवक प्रसाद भैया कळसे, अक्षय गंगेकर, ओंकार जोशी, नगरसेविका माधुरी धोत्रे, साधना धोत्रे, रुक्मिणी धोत्रे आणि प्रणिता ताई घाडगे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि नगरसेवकांनी लोकशाही प्रक्रियेबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे मतदान करत संघटनेची एकजूट आणि राजकीय सक्रियता अधोरेखित केली. पंढरपूर शहराच्या विकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधित्वासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






