IND vs SCO: सामन्याच्या आधी स्कॉटलंडने भारताला दिले ओपन चॅलेंज; हिम्मत असेल तर…
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या लढती आधी स्कॉटलंड क्रिकेटने सोशल मीडियावर भारताला आव्हान देणारे मेसेज पोस्ट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, भारत जर तुम्हाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर आमचा पराभव करून पुढे जावे लागले. त्यानंतर आणखी एक ट्विट करून त्यांनी संघाची तुलना एवेंजर्स अशी केली आहे.
वाचा- आव्हान संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजला बसला मोठा झटका; या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती
वाचा-Video: हॅट्रिक चेंडूवर कॅच सोडला; गोलंदाजाने सुनावले आणि माफी मागायला लावली
स्कॉटलंड संघाने टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी सुपर १२ फेरीपर्यंत मजल मारली असली तरी ग्रुप बी मध्ये त्यांनी न्यूझीलंड सारख्या संघाला झुंजवले होते. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवायचे असेल तर स्कॉटलंडचा मोठ्या अंतराने पराभव करावा लागले. भारताने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ३ पैकी फक्त १ मॅच जिंकली आहे.