द.ह.कवठेकर प्रशालेत कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/१२/२०२४- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन येथील द.ह.कवठेकर प्रशालेत संपन्न झाले.भारत सरकारच्या स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून पूना बिजनेस ब्युरोचे चार्टर्ड इंजिनिअर प्रसाद तावसे सर व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव एस.आर.पटवर्धन सर उपस्थित होते. शासनाद्वारे या कौशल्य विकास केंद्र अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कोर्सेस चे आयोजन केले जाते. सध्या सोलर पी.व्ही.इन्स्टॉलेशन व रिटेल सेल्स असोसिएट हे एनएसडीसी मान्यताप्राप्त असणारे कोर्स प्रारंभी सुरू करण्यात येत असल्याची माहिती निदेशक विनय वासुदेव उत्पात यांनी दिली.या कोर्सचा कालावधी दोन महिन्याचा असून हे पूर्ण प्रशिक्षण केंद्र शासनामार्फत मोफत दिले जाते.हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करू शकतात.

या कोर्ससाठी 18 वर्षे पूर्ण झालेले दहावी बारावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.या केंद्रास मिटकॉन पुणे चे असिस्टंट मॅनेजर अकबर शेख व आयटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्हिनसिस मॅनेजर श्री पांडे व संतोष कुलकर्णी यांनी भेट दिली.ज्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी द.ह. कवठेकर प्रशालेतील तंत्रनिदेशक विनय उत्पात व चिंतामणी दामोदरे सर यांची भेट घ्यावी असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी केले.डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या बॅचची नाव नोंदणी द.ह. कवठेकर प्रशालेत सुरू झाली आहे.


