लातूर पोलिसांनी चंदनाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली

[ad_1]

sandalwood
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात चंदनाची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे.  पोलिसांनी तस्करी करत असलेले 12.08 लाख रुपयांच्या किमतीचे चंदन जप्त केले आहे. या चंदनाचे वजन 152 किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदर माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या याआधारे, स्पेशल टास्कफोर्सच्या पथकाने महामार्गावरील औसा जवळ तस्करीच्या घटनेचा छडा लावला.एसटीएफच्या पथकाने शनिवारी रात्री एक एसयूव्ही थांबवली पोलिसांनी वाहनांची तपासणी घेताना त्यांना वाहनांत 12.08 लाख रुपयांच्या किमतीचे चंदन आढळून आले नंतर पोलिसांना चंदनच्या तस्करीची माहिती मिळाली. 

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यापैकी एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

Edited By – Priya Dixit

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top