धक्कादायक! आई आणि लेकराने एकमेकांच्या डोळ्यांदेखत गमावले प्राण, बँकेच्या कामासाठी निघाले अन्….


अमरावती : अंजनगाव-अकोट मार्गावरील खाऱ्या नाल्याजवळ झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज याच महामार्गावर अडगाव-नाथवाडी फाट्याजवळ आणखी एक अपघात झाला आहे. दुचाकी व स्विफ्ट डिझायर कारच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील माय-लेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिकराम मावस्कार आणि पिकलाबाई मावस्कार दोघेही रा. पोपटखेड, ता. चिखलदारा असे मृत आई व मुलाचे नाव आहे. घटनेच्या वेळी मृत मायलेक हे हीरो होंडा दुचाकीने (एमएच ३०/ बी एच ०९३७) पथ्रोट येथे बँकेच्या कामासाठी जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर चारचाकीने (एमएच ४७/ एन १३४८) त्यांना धडक दिली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

चारचाकी चालक चंदू ना. वानखडे (३५) रा. काकडा हा अपघात होताच तेथून फरार झाला. मृतांचा चुलतभाऊ प्रवीण आजा मावस्कर, रा. पोपट खेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
VIDEO : ‘या’ आजींनी जे म्हटलं ते आयुष्यात विसरणार नाही तुम्ही, एसटी कर्मचाऱ्यांना म्हणाल्या…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: