पंढरपुरातील सर्व व्यावसायिकांना तपासणी करण्याचे आवाहन

पंढरपुरातील सर्व व्यावसायिकांना तपासणी करण्याचे आवाहन Appeal to all traders in Pandharpur to investigate
पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी व हातगाडीवर फिरून विक्री करणारे फळ,भाजीपाला व इतर विक्रेते यांना आवाहन
 पंढरपूर /नागेश आदापूरे - पंढरपूर नगरपरिषद च्यावतीने शहरातील सर्व व्यापारी व दुकानात काम करणारे कर्मचारी ,खाली बसून किंवा हात गाडीवर फिरून विक्री करणारे फळ भाजीपाला व इतर विक्रेते यांना आवाहन करण्यात आले आहे की, सध्या जिल्ह्यातील कोरोना चा covid-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिलेल्या निर्देशानुसार पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी दुकानात काम करीत असलेले सर्व कर्मचारी, खाली बसून किंवा  हात गाडीवर फिरून विक्री करणारे फळ भाजी व इतर विक्रेते यांनी कोरोनाची RTPCR चाचणी करून घेणे बंधनकारक आहे .

त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी येत्या 3 दिवसात म्हणजे दि 13 जून 2021 पर्यंत उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) व नगरपरिषदचा जुना सरकारी दवाखाना (जुनी पेठ) येथे सकाळी 11 ते 3 या वेळेत आपली कोरोना RTPCR ची तपासणी करून घ्यावी. आपली व अधिनस्त कर्मचारी यांचे तपासणी केलेले सर्टिफिकेट दुकानात ठेवणे बंधनकारक आहे.

14 जून 2021 पासून महसूल,नगरपालिका व पोलिस प्रशासनचेवतीने तपासणी करण्यात येणार आहे.तपासणी केलेले सर्टिफिकेट दुकानात किंवा हातगाडीवर नसल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायद्यामधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल .तरी सर्व व्यापाऱ्यांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी  अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: