आमदार मुरजी भाई पटेल यांनी ना.रामदास आठवले यांची घेतली भेट व आशिर्वाद

आमदार मुरजी भाई पटेल यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घेतली भेट

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/१२/२०२४- अंधेरी चे नवनिर्वाचित आमदार मुरजी भाई पटेल यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने आपण निवडून आल्याने कृतज्ञ भावनेने आमदार मुरजी भाई पटेल यांनी ना.रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे आमदार मुरजी भाई पटेल यांचा आमदारपदी निवडून आल्याबद्दल सत्कार केला.

याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, संघटन सचिव परशुराम वाडेकर,अंधेरी तालुकाध्यक्ष संजय खंडागळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top