तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यातील हॉस्पिटल्सनी कृती आराखडा तयार करावा-पालकमंत्री सतेज पाटील

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यातील हॉस्पिटल्सनी कृती आराखडा तयार करावा-पालकमंत्री सतेज पाटील In the district to combat the third wave Hospitals should prepare action plan- Guardian Minister Satej Patil
  कोल्हापूर,दि.23 (जिल्हा माहिती कार्यालय)- तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्या तील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध असले पाहिजे.त्यादृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पीटल्सनी सज्ज रहावे तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवारपर्यंत तयार करावा असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग तज्ज्ञांच्या दूरदृष्य प्रणालीव्दारे (व्ही.सी) आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले.

   या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येपैकी 18 वर्षाखालील युवक,युवतींची संख्या अंदाजे 10 लाख इतकी आहे. पालकमंत्री म्हणाले की या मुले,मुलींची संख्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने निश्चित करण्यात यावी. आरोग्य विभागाने गाफील न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेचे सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 200 आयसीयु बेड लागतील. या करिता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अनुक्रमे 50,खाजगी रुग्णालयात 150 व्हेंटीलेटर बेड तालुकानिहाय निश्चित करण्यात येणार असून यामध्ये 10 ऑक्सीजन तर 2 व्हेंटीलेटर बेडचा समावेश असेल असेही स्पष्ट करुन डॉक्टरर्सनी मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाहीतर आश्वस्त करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

 या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी ज्या ठिकाणी कोविड हॉस्पीटल्स आहेत त्या ठिकाणी लहान मुलांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे तसेच त्यासाठी लागणारी अत्यावश्यक लागणारी वैद्यकीय उपकरणेही रुग्णालयांनी तयार ठेवावीत, तसेच आवश्यकतेनुसार खरेदी करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.

   सीपीआर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ.संगिता कुंभोजकर यांनी जिल्ह्यातील केवळ 5 टक्के बालकांना ऑक्सीजन तर 1 ते 2 टक्के मुलांना व्हेटींलेटर लागण्याची शक्यता या बैठकीत व्यक्त केली.

व्हीसीव्दारे पार पडलेल्या या बालरोग तज्ज्ञांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी काही महत्वपूर्ण सूचना करताना या उपचार पध्दतीमध्ये पालकांना येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे निरसन केले.

 या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल माळी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक पोळ आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील इतर मान्यवर बालरोग्य तज्ज्ञ व्ही सी व्दारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: