माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी देवेंद्र भंडारे यांच्या प्रकृतीची केली चौकशी

माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आजारपणामुळे प्राईड हॉस्पिटल सोलापूर येथे ऍडमिट

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर येथील माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आजारपणामुळे प्राईड हॉस्पिटल सोलापूर येथे ऍडमिट आहेत. या ठिकाणी माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी रविवार दिनांक ०५ मे २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.यावेळी मा.नगरसेवक नरसिंग कोळी, बाबराव म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, सुरेश पाटोळे, आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश चिटणीस संजय हेमगड्डी, नरसिंह आसादे, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, बसवराज म्हेत्रे, नागेश म्हेत्रे, जेम्स जंगम, दिनेश म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, राहुल म्हेत्रे, राजू म्हेत्रे, व्यंकटेश भंडारे, परशुराम सत्तारेवाले, तिरुपती परकीपंडला यांनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *