उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी समाधान श्रीपती कसबे,सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे,सतीश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे ,सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे.जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे.
या घटनेची हकीकत अशी की,सदर घटनेतील फिर्यादी शंतनू भारत धोत्रे हा आहे. दि.२४/३/२०२४रोजी फिर्यादी हे गावातील मारुती मंदिराच्यासमोर रात्री ८.०० वा चे सुमारास होळी सणाच्या निमित्त नैवेद्य दाखविणेस येवून मंदिराचे बाहेर नारळ फोडून थांबला असताना समाधान श्रीपती कसबे, सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे, सतिश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे, सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता मंगळवेढा असे येवून समाधान श्रीपती कसबे याने फिर्यादीस तुझे कसले पैसे मी तुला देणार नाही म्हणून शिवीगाळ करू लागले असता फिर्यादी समजावून सांगत असतानाच त्या सर्वांनी मिळून त्यास हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण करून आकाश खंडू आयवळे,सचिन खंडू आयवळे, समाधान श्रीपती कसबे यांनी मारुती मंदिरा समोर असलेल्या होळीमधून लाकूड आणून त्या लाकडांनी तिघांनी मिळून फिर्यादीचे डोकीत,पाठीवर,डावे पायाचे मांडीवर जोरात मारून जखमी केले.त्यांच्या डोक्यातून रक्त येवू लागल्याने महादेव येसू पाटील,राजु आप्पा करे,संजय वसंत रजपूत वगैरे लोकांनी येवून सोडवासोडव केली त्यानंतर फिर्यादीस मारणारे लोक निघून गेले.
फिर्यादीचा मामा पिनू लक्ष्मण पाटील, उत्तम केराप्पा बेलदार यांनी येवूनै फिर्यादीस उपचारासाठी हॉस्पीटल येथे उपचारास दाखल करून प्राथमिक उपचार घेवून मंगळवेढा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिलेली आहे.
सदर प्रकारामुळे आरोपी विरूध्द भा.द.वि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२६, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गु.र.नं. २१२/२०२४ चा गुन्हा दिनांक २६/३/२०२४ रोजी रात्री ८.०० वाजता मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दाखल करणेत आलेला आहे.
सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने ॲड. संदिप कागदे यांनी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून अर्जदार यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणेत आला.
सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने ॲड. संदिप कागदे, ॲड.महेश कसबे,ॲड.काकासो केंगार,ॲड.सपना आरकड यांनी काम पाहिले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.