डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी महायुती उमेदवार यामीनी जाधव या भिमकन्येला विजयी करा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी महायुती उमेदवार यामीनी जाधव या भिमकन्येला विजयी करण्याचा निर्धार करा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या मतदार संघात काँग्रेस पक्षाने पराभव केला होता.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या अवमानाचा बदला घेण्यासाठी आंबेडकरी समाजातुन पुढे आलेल्या महायुतीच्या उमेदवार यामीनी यशवंत जाधव या भिमकन्येला विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

दक्षिण मुंबई च्या महायुतीच्या उमेदवार यामिनी ताई यशवंत जाधव यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची आज सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव, रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ,रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष संजय पवार,चंद्रकांत पाटील, आशाताई लांडगे,अभया सोनवणे,घनश्याम चिरणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *