सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला केली अटक

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून केली अटक

मुंबई – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचं एक पथक गेल्या चार दिवसांपासून भिरडाना या ठिकाणी होतं.

हरपाल सिंह याच्यावर आरोपींना रेकी करण्यास मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी हरपाल सिंह याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमानचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत.

पोलिसांच्या पथकाने मोबाईलच्या दुकानांमध्ये देखील चौकशी केली आणि हरपालसिंह याबद्दल मोहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची मुंबई क्राइम ब्रँच चौकशी करत होती त्यात हॅरी उर्फ ​​हरपाल सिंहचं नाव पुढे आलं होतं.

हॅरी उर्फ ​​हरपाल मोबाईल फोनद्वारे अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींच्या संपर्कात होता.याशिवाय आरोपींसोबत त्याचे व्यवहारही होते. मुंबई क्राइम ब्रँचच्या टीमने आतापर्यंत अटक केलेल्या सहा आरोपींमध्ये दोन शार्प शूटरचाही समावेश आहे.सहा आरोपींमधील एका आरोपीने तुरुंगातच स्वतःला संपवलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने सागर पाल, विक्की गुप्ता, अनुज थापन आणि सोनू बिश्नोई यांच्यावर मकोका लावला. या गोळीबार प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल हे देखील आरोपी आहेत.या दोघांच्या सांगण्यावरून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार करण्यात आला आणि त्यापूर्वी रेकीही करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *