नागपुरात टीशर्टच्या पैशांच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्घृण खून

[ad_1]

murder
नागपुरात दोन मित्रांमध्ये एका टीशर्ट साठी 300 रुपयांसाठी झालेल्या वादामुळे एका मित्राने भावासह मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

ALSO READ: ठाण्यात शाळेजवळ झाडाला गळफास लावून विद्यार्थ्यांची आत्महत्या

सदर घटना शांतिनगर पोलिस ठाण्यांतर्गत कावरपेठ परिसरात घडली आहे.तरुणाने ऑनलाइन टी शर्ट मागवले होते त्याची कीमत 300 रूपये होती मात्र त्याला हा टीशर्ट व्यवस्थित बसला नसल्याने त्याने आपल्या मित्राला तो टी शर्ट दिला. मित्राने टी शर्टचे 300 रूपये देण्यास नकार दिला. या वरुन दोघांमध्ये वादावादी झाली.

ALSO READ: नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मित्राने शिवीगाळ केल्यावर आरोपी तरुणाच्या तोंडावर पैसे फेकून दिले नंतर आरोपी तरुणाला याचा राग आला आणि त्याने आपल्या भावासह मित्राचा गळा चिरून खून केला. 

हत्येचे वृत समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही आरोपींना अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींची चौकशी केल्यावर पुढील कारवाई करण्यात येण्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By – Priya Dixit 

 

ALSO READ: शारीरिक संबंध ठेवताना महिलेने शेजारच्या तरुणाचा गळा चिरला

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top