नागपुरातील एका खासगी शाळेतील शिक्षकाने सांस्कृतिक केंद्राच्या वॉशरूम मध्ये महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवल्याचा संशय एका महिला शिक्षकाला आल्याने तिने पोलिसांना ही माहिती दिली.नंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. खिडकीतून तो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच्या मोबाइलमध्ये असे अनेक व्हिडिओ सापडले आहे.
ALSO READ: नागपुरात टीशर्टच्या पैशांच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्घृण खून
आरोपी शिक्षक एका खासगी शाळेत ड्रॉइंगचा शिक्षक होता. त्याने वाशरूम मध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले. सांस्कृतिक साहित्य संम्मेलनात सहभागी झालेल्या एका महिलेला वाशरूमच्या खिडकीतून काही संशयास्पद हालचाली होतांना दिसल्या. वॉशरूमच्या खिडकीतून मोबाईलवरून कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत असल्याचे तिने रंगेहाथ पकडले. महिलेला संशय आल्यावर तिने तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली.
ALSO READ: नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला घटनास्थळावरून पकडले. प्रकरणाची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आली.आरोपीने या पूर्वी देखील अनेकदा महिलांच्या वॉशरूम मध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. आरोपीच्या मोबाईल मध्ये अनेक महिलांचे आंघोळ करतानाचे आणि वॉशरूम मध्ये असल्याचे व्हिडिओ सापडले आहे.
ALSO READ: सरकारी शाळेत आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी तपास सुरू केला
आरोपी एका खासगी शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून काम करत असून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून हा व्हिडिओ कुठे आणि कोणत्या उद्देश्यने बनवायचा याचा शोध पोलिस घेत आहे.
Edited By – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.