LIVE: गडचिरोलीमध्ये 4 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले


Maharashtra

Maharashtra Marathi Breaking News Live Today: गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसमोर एका डीव्हीसीएम आणि एका एसीएम रँकच्या नक्षलवादीसह चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली, यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सल्ला दिला आणि म्हणाले, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. सविस्तर वाचामहाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासून सर्व सरकारी, निमसरकारी आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषा बोलणे सक्तीचे केले आहे. सविस्तर वाचारेल्वे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वेमध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली. देशभरातील रेल्वेमध्ये एकूण १ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
नितेश राणे यांचे मोठे विधान, म्हणाले- महाराष्ट्रात धर्मांतराविरुद्ध सर्वात कठोर कायदा आणून दाखवू
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. चंद्रपूरमध्ये समस्त हिंदू समाजातर्फे एका भव्य धार्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राणे यांनी आपल्या भाषणात एका विशिष्ट समुदायाला इशारा दिला.



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading