पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीमधील खाजगी हॉस्पिटलने सरकारी नियमावलीनुसार बिल आकारणी केली नाही तर गांधीगिरी पद्धतीने ठिय्या आंदोलन केले जाईल – अजित संचेती If the bill is not levied as per government rules, then sit-in agitation by Gandhigiri method – Ajit Sancheti
पिंपरी चिंचवड - सर्व पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका हद्दीमधील हॉस्पिटलच्या सर्व व्यवस्थापनाने हॉस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या रुग्णांकडून सरकारनेने बिलासंदर्भात दिलेल्या कोविड 19 नियमावलीमधेच बिले घ्यावीत असे आवाहन भारतीय राष्ट्रवादी पार्टी प्रदेश जनसंपर्क प्रमुख अजित संचेती यांनी केले आहे .
काही हॉस्पिटलकडून अजूनही सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम न करता बिल आकारले जात आहेत असे निर्दशनास आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे सध्या सर्वांचे आर्थिक गणित ढासळलेले आहे. अनेक ठिकाणी नातेवाईकांनी आपली जागा,घर, सोने विकून गहाण ठेऊन औषधे विकत घेत असल्याचे दिसत आहे. या कोरोनाच्या कठिण परिस्थितीत रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक हे आपणास देव म्हणून बघत आहेत.आता हॉस्पिटल चे बिल बघून मानसिक व आर्थिक दबावामध्ये येत आहेत.काही ठिकाणी उपचारासाठी पैसे नसल्या कारणाने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशा काही तक्रारी येत आहेत. असे असेल तर आपल्या हॉस्पिटलवर येऊन गांधीगिरी करत ठिय्या आंदोलन करू, त्यामुळे आपण सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बिल घ्यावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश जनसंपर्क प्रमुख आणि सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी अजित संचेती यांनी केले आहे.